महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी नुकताच , गुजरात येथे भेट देऊन देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक बंदरांपैकी एक असलेल्या
मुंद्रा पोर्ट या बंदराला भेट दिली आणि या दरम्यान त्यांच्याकडून या बंदराच्या अत्याधुनिक सुविधेबद्दल त्याचबरोबर ,
बंदर व्यवस्थापन, कंटेनर हाताळणी व्यवस्था, लॉजिस्टिक्स नेटवर्क, यांत्रिकीकरण तसेच विविध पायाभूत विकास कामांची माहिती हि घेण्यात आली .
या दरम्यान अदानी पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री.करण गौतम अदानी उपस्थित होते. त्यांच्यासोबत मंत्री नितेश राणे यांची बंदर विकास, सागरी वाहतूक, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
आणि भारताच्या आर्थिक विकासात बंदर क्षेत्राची भूमिका या बद्दल या बाबतीत चर्चा पार पडली .







