राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथे केळी बागेची, नायगाव येथे व्हीबीजी रामजी योजनेंतर्गत सुरू असलेल्या पांदण रस्ता कामाची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेतकरी आणि मजुरांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा तसेच शेतीचे नुकसान, पाणीटंचाई, चारा व रोजगाराविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला .
यावर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण निर्माण झाल्यामुळे , शेतकऱ्यांची परिस्थिती, त्यांचा शेतात प्रत्यक्षपणे जाऊन जाणून घेणे हि माझी जबाबदारी आहे . दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन विविध माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करत आहे आणि ही समाधानकारक बाब आहे असं ते या वेळी म्हणाले.
त्याचबरोबर ‘व्हीबीजी रामजी’ योजनेतून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून राज्य शासनाने;
हाती घेतलेल्या नदीजोड प्रकल्पामुळे भविष्यात पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना होण्यास मदत होईल अशा प्रकारचं मत सुद्द्धा त्यांनी या दरम्यान व्यक्त केलं .
दुष्काळाच्या या संकटात सरकार सर्व पातळीवर काम करत असून दुष्काळ निवारणासाठी करण्यात येत असलेल्या तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये नागरिकांनीही सहभागी होणे आवश्यक आहे .
सरकार आणि समाजाने एकजुटीने काम केल्यास कोणत्याही संकटावर मात करणे शक्य आहे अश्या प्रकारची भावना सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि इतर अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थतीत होते .







