भारतीय हवाई दलाचा एअर फेस्ट हा दोन दिवसीय एअर शो नागपूर मध्ये २१ व २२ नोव्हेंबर या दिवसांत पार पडला. हा सोहळा वायुसेना नगर या परिसरात आयोजित करण्यात आला होता .
या एअर शो मध्ये भारतीय हवाई दलाचा लढाऊ विमानांनी, त्याचबरोबर सूर्यकिरण एरोबॅटिक टीम आणि सारंग हेलिकॉप्टर पथक या सर्वानी चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिके या एअर शो चा दरम्यान सादर केली.
दोन दिवस चालेल्या या एअर शो ला सोळा हजारहून अधिक प्रेक्षकांची उपस्थिती लाभली . तसेच या सोहळ्याचा समापन सोहळ्याला केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरीजी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली हे विशेष






