चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे डब्ल्यूसीएल व सीएसटीपीएस कडून होणारी कोळसा वाहतूक, हवेत उडणारी राख आणि उघड्यावरून नेला जाणारा कोळसा यामुळे निर्माण होणारी तीव्र धुळ आणि प्रदूषणाचा मुद्दा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आधी विधानसभेत मांडला होता .
या प्रश्नाची दखल घेत , महाराष्ट्र राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे नुकताच भेट दिली आणि तिथल्या परिस्थितीची पाहणी केली .
या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जानगर येथील धूळ आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या विपरीत परिणामांबद्दल सविस्तर चर्चा झाली.
या वेळी आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि ,डब्ल्यूसीएल व सीएसटीपीएस प्रशासनासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला या बाबाबत प्रभावी आणि त्वरित योग्य त्या उपाय योजना अंमलात आणण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
कोळसा वाहतुकीत सुधारणा, रोपवे व्यवस्थेचे आधुनिकीकरण, धुळप्रदूषणावर नियंत्रण आणि दीर्घकालीन पर्यावरणीय उपाययोजनांवर भर देण्याचे निर्देश त्यावेळी देण्यात आले असं आमदार सुधीर मुनगंटीवार या दरम्यान म्हणाले .
.







