आसाम मध्ये विधानसभेचे वारे वाहत आहेत आणि त्यामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार तिथे सुरु आहे असं बघायला मिळतंय तर, आसाम मधील विधानसभेचा निवडणुकीचा प्रचारामध्ये भाजपने आपले दिग्गज नेते उतरवले आहे असं बघायला मिळालं .
त्यामध्ये आधी देशाचे गृहमंत्री आणि भाजप चे जेष्ठ नेते अमित शाह यांनी सुद्धा आसाम मध्ये जाऊन तिथे प्रचार केला आणि काँग्रेस च्या राजवटीत आसाम मध्ये विकास न केल्याची टीका केली ते या दरम्यान म्हणाले कि इतकी वर्षे काँग्रेस ची सरकार आसाम मध्ये होती
मात्र काँग्रेस ने आसाम चा विकासासाठी काही केलं नाही , मात्र जेव्हा पासून नरेंद्र मोदी ची सरकार आली तेव्हा पासून आसामचा विकासामध्ये बरीच प्रगती त्यांचा सरकार ने केली आहे असं ते म्हणाले.
दरम्यान या प्रचारामध्ये देशाचे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री आणि भाजप चे जेष्ठ नेते नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यंमत्री आणि भाजप चे नेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा
आसाम मधील विधानसभेचा प्रचारासाठी तिथे प्रचारामध्ये भाग घेताना आणि लोकांना तिथे परत एकदा भाजपाची सरकार आणण्यास तेथील जनतेला आव्हान करताना दिसले .







