विकास यांच्या गावांत काही यांनी केला नाही.
शासनाकडून जो पैसा विकासाच्या नावावर यायचा तो यांनी आपली घरे भरण्यासाठी उपयोगात आणला आणि तिकडे सातत्याने बघायला मिळायच की लोकांची प्रगती काही होत नाही आहे.
आजही विकास न झाल्यामुळे अनेक गावांत रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र दिसते.
काहीही नाही तर आपल्या गावातील, तालुक्यातील रस्ते तरी बरे असावे तस काही चित्र बघायला मिळत नाही.
रस्त्यांवर खड्डे पडलेले दिसतील, त्याचबरोबर, गावात किंवा तालुक्यात बाजारांची अवस्था दयनीय दिसेल.
शिक्षणाचा पुरता ढोल वाजवून ठेवल्या मुळे कित्येक मुलांची आणि लोकांची परिस्थिती आणखी बिकट झालेली आहे.
दर्जेदार शिक्षण न मिळाल्यामुळे मुलांना समोर लोकं कोणकोणते योग्य मार्ग उपलब्ध आहेत रोजगारासाठी याच काही शोध घेता येणार नाहीअश्या प्रकारची परिस्थिती आहे अस बघायला आणि अनुभवायला मिळते आणि ही मोठी समस्या असते या दिवसांत.
शिकून सुद्धा या दिवसांत मोठ्या प्रमाणात लोकांना बेरोजगार रहाव लागत. किंवा मोठ्या प्रमाणात लोकं आपली गावे सोडून शहरांकडे पलायन करत आहे अस दृश्य अनेक गावांत अनुभवायला मिळत.
स्त्रियांचा रोजगाराचा समस्या असतात, स्त्रियांचा आरोग्याचा समस्या असतात, स्त्रियांचा अत्याचाराचा समस्या असतात. स्त्रियांचा हक्कांचा समस्या तिथे असतात हे आपल्याला अनुभवायला आणि बघायला तिथे सातत्याने मिळेल. मात्र यांचे प्रश्ण कित्येकदा तसेच राहतात.
शाळा, महाविद्यालये, रस्ते, विहिरी, तलाव, पाण्याचा टाक्या, विजेचा प्रश्ण, इस्पितळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या अनेको वर्षापासुन सातत्याने तशाच जेव्हा पडून आहेत तर त्या सोडविणे आवश्यक असते आणि त्या सोडविल्या गेल्या पाहिजे मात्र, प्रश्ण त्यांचे म्हणजे लोकप्रतिनिधींचे प्रश्ण हे वेगळे असतात.
ह्या गरीब, गरजू लोकांना विकासापासून दूर ठेवणे. त्यांना शिक्षणापासून दूर ठेवणे, रोजगार मिळविण्या पासून दूर ठेवणे, विभाजनकारी राजकारण करणे, आणि गावकर्यांना अश्या प्रकारे मूर्ख बनविणे अश्या प्रकारचे यांचे मुद्दे असतात.
त्यामुळे आजसुद्धा कित्येक क्षेत्रामध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती बरी नसते. लोकांना रोजगार नसतो. शाळा महाविद्यालये यांची अवस्था बरी नसते.
मोठ्या प्रमाणात लोकं शहरांकडे चालले आहेत अस दिसत त्यामुळे, शहरांत लोकसंख्या वाढायला लागली आहे अस अनुभवायला मिळत आणि गावे ही ओसाड पडायला लागली आहे अस बघायला मिळत.
अनेकांच्या जमिनी तिथली लोकं पैसा पाणी आणि रोजगार नसल्यामुळे विकायला निघाली आहेत अस अनुभवायला मिळत. स्त्रियांच्या डोळ्यात अश्रू असतं मुलाबाळांना शिक्षण मिळत नाही. कारण शेती बुडालेली असते. गावात शोधूनही रोजगार मिळत नाही. मायबाप उपाशी मरत असतात आणि त्याचबरोबर अनेक मुलाबाळांची परिस्थिती ही त्यामुळे चिंताजनक असते आणि या सर्वांसाठी जबाबदार कोण असतो?
तर तिकडे मात्र तिथल्या पुढाऱ्यांची संपत्ती मात्र दिवसेंदिवस वाढत असते.
आणि त्यांच्या मोटारगाड्या गावातील कच्च्या आणि छोट्याश्या रस्त्यावरून धूळ उडवत जात असतात.







