सचिन तेंडुलकरच्या मैदानात येताच प्रेक्षकांचा जल्लोष अनेकदा बघायला मिळायचा. शिट्ट्या, टाळ्या आणि प्रेक्षकांच सचिन सचिन म्हणुन ओरडणे आणि तिकडे सचिनला मैदानात येतांना बघून प्रतिस्पर्धी खेळाडूंची सुद्धा चिंता वाढायला लागायची कारण सचिन खेळायचाच त्याप्रकारे . सुरवातीच्या षटकांमध्ये तो गोलंदाजांची बरीच धुलाई करायचा.
मग तो संघ कोणताही का असेना आणि गोलंदाज कोणताही का असेना तो मैदानावर असे पर्यंत ज़बर्दस्त फलंदाजीने आणि फटक्यांनी मैदानात रंग भरून टाकायचा , जे मुलं तेव्हा चड्ड्या सुद्धा घालायला शिकलेले नव्हते ते सुद्धा सचिनला ओळखत होते आणि त्याचे दिवाने होते .
सचिनची फलंदाजी बघणे आनंदायी असायचं , सचिन ने मारलेल्या फटक्यांमुळे चेंडू कधी खेळाडूंचा समोरून निघून जायचा याची कल्पना कित्येकदा क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या खेळाडूंना सुद्धा नसायची .
अनेक वेगवान गोलंदाजांची सुरवातीच्या षटकात जबरदस्त धुलाई होतांना त्या दरम्यान बघायला मिळायचं . सचिनने अनेको वर्षे भारतीय क्रिकेट चाहत्यांच आणि लोकांच प्रचंड मनोरंजन केल. छोट्यांपासुन मोठ्यांपर्यंत आणि म्हाताऱ्यांपासून , मुलींपासून,स्त्रियांपर्यंत सगळे सचिन चे दिवाणे होते. सचिन च्या खेळाने खऱ्या अर्थाने कदाचित भारतीय लोकांना क्रिकेटवर मनापासून प्रेम करायला शिकवलं.
फटकेबाजी कशी करायची हे कित्येक युवा खेळाडू कदाचित त्याच्या कडून शिकले. तो अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणा होता आणि अनेक खेळाडूंचा गुरू सुद्धा होता. सचिन च्या धडाकेबाज फलंदाजीने कित्येक गोलंदाज त्यावेळी बिथरलेले असायचे. त्यांना रात्री झोपा सुद्धा यायचा नाही अस सुद्धा वर्तमानपत्रात वाचायला त्यावेळी मिळायच अशा प्रकारे सचिन त्यावेळी खेळत होता .
आम्ही सुद्धा सचिनची फलंदाजी बघण्यासाठी टीव्ही समोर जाऊन बसायचो. कारण गोलंदाजांची धुलाई करताना बघणे सगळ्यांना आवडायच. एवढ्या मोठ्या देशाचा त्यावेळी एकच आयकॉन होता आणि तो म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर.
आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा वाढदिवस आहे . आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल .
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !







