महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच (मुंबई पुणे ) दृदगती मार्गाला पूर्णपणे एक्सप्रेस कंट्रोल बनवणाऱ्या मार्गाची पाहणी केली . मुंबई पुणे दृदगती मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे असं ते या दरम्यान म्हणाले . या प्रकल्पाला मिसिंग लिंक हे नाव देण्यात आले आहे .
या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. त्यामुळे नागरिकांची घाटातील वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन जलद दळणवळणामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली .
हा रस्ता लोणावळा तलावाचा १८२ मीटर खालून जाणार आहे आणि या प्रकल्पाचे काम पूर्ण करणे हे मोठे आव्हान होते आणि त्या करिता त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे सांगत त्यांचे विशेष कौतुक केले.
हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. चारचाकी वाहने आणि बसेस यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी ते म्हणाले .
येत्या १ मे रोजी या प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे असे ते पुढे म्हणाले .







