बऱ्याचदा असे क्षण येतात, जेव्हा एखादा देश केवळ बदलाचा भाग राहत नाही, तर स्वतः परिवर्तनाचा मार्ग दाखवतो. आज भारत अशाच निर्णायक टप्प्यावर उभा असून जगाला नवी दिशा देत आहे. जगभरात अनिश्चिततेचे वातावरण असताना भारत जागतिक स्तरावर भक्कमपणे उभा आहे.
गेल्या दहा वर्षांत जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला असून, स्थिर धोरणे, मोठी स्वप्ने आणि प्रभावी कामगिरीमुळे आज भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे. अश्या प्रकारचं मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे CII ॲन्युअल बिझनेस समिट २०२६ मध्ये बोलताना मांडले .
विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे अशे ते या दरम्यान म्हणाले .
वेगवान विकास, व्यापक प्रगती आणि परिवर्तनशील दृष्टिकोनाच्या जोरावर महाराष्ट्र या प्रवासात आघाडीवर राहील असं सुद्धा मत त्यांनी या दरम्यान मांडलं.







