आजकाल काही राजकीय पक्षांची अवस्था बघा काय झाली आहे. असं वाटत कि शेळ्यांचा एखादा मोठा कळप आहे किंवा गायी-बैलांचा कळप आहे आणि जिकडे चारा मिळेल तिकडे त्यातील बरेच लोकं दररोज जाताना आणि येताना दिसतात .
त्यातले कोणी सतरंज्या उचलताना दिसतात, काही जण झाडू मारताना दिसतात , काही फरश्या पुसताना दिसतात, त्यातले काही गाड्या पुसताना दिसतात काही पुढाऱ्यांचे माईक पकडून असल्याचे दिसतात .
काही फायली पकडून पुढाऱ्यांसोबत चालताना दिसतात, काहींना गाड्या धुण्याचं काम दिलेलं असते आणि त्यातले काही मालकाची छत्री घेऊन मालकांसोबत चालत असतात . तर काही लोकं नाचताना दिसतात .
काहींना भुंकण्यासाठी ठेवलेलं असते,तर काहींना घरातील सामान आणण्याच आणि काहींना पुढाऱ्यांचा मुलांना शाळेत नेण्या-आणण्याच काम दिल जाते. पण प्रत्येकाला मात्र सांगितल हेच जाते कि , “हो हो नकीच, येणाऱ्या काही वर्षांत आम्ही तुम्हाला नक्कीच पुढारी बनवून टाकू
म्हणजे, गावातील साधासा सरपंच होण्यासाठी सुद्धा, तुम्हाला आधी मालकासाठी ही कामे करावी लागतात आणि जर का तुम्ही त्यांची कामे केली नाही तर पुढे तुमची प्रगती सुद्धा मुद्दाम होऊ दिल्या जात नाही . तर बघा कश्या प्रकारचे दिवस आले आहेत लोकांसाठी . त्याच बरोबर या दिवसांत लोकांना या पक्षातून त्या पक्षात जाणे अधिक सोपं झालं आहे .
जो कोणी चाऱ्यासाठी अधिक पैसे देतो तिकडे पलटी या दिवसांत मारली जाते आणि या दिवसांत फुकटात सुद्धा कुणी भुंकत नाही . भुंकायला सुद्धा या दिवसांत आधी बोट्यांसाठी पैसे द्यावे लागतात; बोट्या खातील तर भुंकतील अशी परिस्थिती असते , बोट्या नाही खातील तर कुठून भुंकतील? तर या प्रकारची परिस्थिती या दिवसांत लोकांची आणि राजकीय पक्षांची आहे .
आणि तिकडे ईव्हीएम अश्या प्रकारे खेळत आहे की लोकांचे परिश्रम हे कमी पडून जातात इतके आश्चर्यकारक आकडे आपल्याला प्रत्येक निवडणुकीत बघायला मिळतात .
ज्या प्रकारे क्रिकेट च्या सामन्यांमध्ये आपल्याला , कधीकधी पूर्णपणे एकतर्फा परिणाम येताना दिसतात त्याच प्रकारे आपण या दिवसांत निवडणुकांमध्ये एकतर्फी निकाल येताना बघतो आणि एकतर्फा निकाल येणे हि सामान्य बाब झाली आहे असं वाटू लागलं आहे .
त्यामुळे असं वाटत कि गावातील लोकांना फक्त एकच पक्ष माहिती आहे आणि तोच पक्ष त्यांना पसंद आहे असं काही निकालांवरून समजतं.
तिकडे काही लोकं वेगवेगळ्या पक्षात असतात, पण त्यांना त्या पक्षात राहून सुद्धा त्या पक्षाची प्रगती होतांना बघणे आवडत नाही अशी सुद्धा परिस्थिती असते .
तर , जर आपल्या गावातील, शहरातील, राज्यातील लोक आपल्याच गावातील लोकांना खाली ओढण्यात लागलेले असतील, तर त्या राज्यातील किंवा शहरातील समस्या कशा कमी होतील . तर हे समजणे आज आवश्यक आहे .







