गणेशोत्सवा निम्मित नागपुरातील वेगवेगळ्या ठिकाणी या दिसवसांत गणपती विराजमान आहेत . गणेशोत्सवा दरम्यान त्यांचं दर्शन घेण्यास आणि त्यांचे रुपडे बघण्यास अनेक भाविकांची गर्दी या दिवसांत सगळी कडे बघायला मिळते .
या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नागपुरातील आपल्या भेटीदरम्यान नागपुरातील विविध ठिकाणी विराजमान झालेल्या गणरायांचे दर्शन घेतले हे अनुभवायला मिळालं. वेगवेगळ्या गणेशमंडळांत विराजमान झालेल्या गणेश मुर्त्यांचे जेव्हा लोकं रूप बघतात त्यावेळी त्यांना वेगवेगळ्या रूपातील गणरायाचे दर्शन होते .
ह्या प्रकारचा सुंदर आणि आकर्षक गणरायाचा मुर्त्या साकारणाऱ्या त्या कलाकारांचे सुद्धा त्यामागचे मोठे परिश्रम आणि त्यांचा गुणांची यामुळे जाण होते . त्यांचा कलेचा माध्यमाने अनेक लोकांना आणि भाविकांना त्याद्वारे गणरायांचे विविध लोभस रूप हे बघायला मिळतात . हे इथे जरा विशेष वाटत .







