महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण तरुणांनी ‘राष्ट्रीय पशुधन अभियाना’अंतर्गत स्वयंरोजगाराचे स्वप्न उराशी बाळगून अर्ज केले होते. मात्र राज्यातील ५१५ प्रकल्पांचे प्रस्ताव गेल्या काही महिन्यांपासून केंद्रीय कार्यकारी समितीकडे मंजूरीच्या प्रतिक्षेत आहेत.
हे सर्व प्रस्ताव ‘शेळी व मेंढी पालन’ या अत्यंत महत्त्वाच्या घटकाशी संबंधित आहेत. यातील एकाही प्रकल्पाला फेब्रुवारी २०२५ पासून मंजुरी मिळालेली नाही. त्यातच गेल्या वर्षभरापासून नवीन नोंदणीसाठी या योजनेचे पोर्टल बंद असून तांत्रिक अडचणींमुळे बँकांसाठी कागदपत्रे अपलोड करता येत नाहीत. या प्रकारची समस्या तिथे निर्माण झाली आहे .
या योजनेसाठी अल्पभूधारक शेतकरी आणि ग्रामीण तरुणांनी आपल्या कष्टाचा पैसा आणि वेळ गुंतवला असून . या प्रलंबित प्रकल्पांमुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा खासदार सुरप्रिय सुळे यांनी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री. राजीव रंजन सिंग यांना पत्र लिहून या बाबतची माहिती दिली
यामध्ये प्रलंबित प्रकल्पांना तातडीने मंजुरी देऊन निधी वितरित करावा त्याचबरोबर नवीन उद्योजकांच्या नोंदणीसाठीचे पोर्टल त्वरित पुन्हा सुरू करावे तसेच बँकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर कराव्यात अशा मागण्या त्यांचा द्वारे या वेळी करण्यात आल्या .







