आज रायगड दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला या दरम्यान ते म्हणाले कि , राजकीय हातक्षेपामुळे मुंबई , गोवा मार्ग हा रखडला आहे .
मागे नितीन गडकरींनी मला सांगितलं होतं कंत्राटदार कंटाळून निघून गेले म्हणून हे काम रखडलं आहे. पण ते कंत्राटदार का कंटाळले याचा विचार केला पाहिजे असं राज ठाकरे या यावेळी म्हणाले .
आपल्याकडे कामापेक्षा टक्केवारीचा विचार जास्त होतो त्यामुळे आपल्याकडचे कंत्राटदार कंटाळलेत असं त्यांना वाटत .
जर आमच्या जमिनी, आमचं पाणी, आमची वीज यावर बाहेरचे पोसले जाणार असतील तर मग या विकासाचा काय उपयोग अश्या प्रकारचा प्रश्न त्यांनीसरकारला या वेळी विचारला
गेल्या १५ वर्षांपासून आपण ऐकत आहोत कि काही दिवसांत मुंबई-गोवा महामार्ग सुरू होईल मात्र
पुन्हा काही दिवसांनी महामार्गावर चाकरमानी अडकल्याच्या बातम्या येणार आहेत असं ते म्हणाले;
त्याचबरोबरर त्यांनी पुढे म्हंटल कि कोणत्याही विकासकामांना विरोध करण्याचा आमचा हेतू नाही पण कोकणातील परिस्थिती पाहिली तर असं वाटतं असा विकास नको.
सरकार नावाची जी गोष्ट असते त्या सरकारने आपल्या लोकांचं हित पहायचं असतं, ती जबाबदारी सरकारची असते.
कोकणात तिसऱ्या मुंबईचा प्रकल्प येतोय त्याबाबत स्थानिकांना कल्पना नाही. इथले तरुण ,तरुणी या गोष्टीसाठी तयार आहेत का? बाहेरच्या तरुणांना कळतं महाराष्ट्रात काय होणार आहे, त्यासाठी तयारी करून ते इथे येतात आणि आपले तरुण मात्र अंधारात राहतात. असा सुद्धा टोला त्यांनी यादरम्यान लगावला .







