भारतातील प्रसिद्ध विशेष सरकारी वकील आणि राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त झालेले ;
विशेष सरकारी वकील आणि खासदार उज्ज्वल निकम यांनी दिल्ली येथे अंगणवाडी सेविकांची आणि दक्षिण गुजरात मधील काही तरुणींसोबत संवाद साधला;
या दरम्यान विकसित भारताचा संकल्पावर आणि यामध्ये ग्रामीण भारतातील मुलींचा भूमिकेवर चर्चा पार पडली .
या चर्चेदरम्यान त्यांचा राष्ट्रसेवेसाठी असलेला उत्साह आणि समर्पण हे अतिशय प्रेरणादायी होते असं मत या वेळी खासदार आणि कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी मांडले .
हि चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारत या संकल्पनेवर घडून आली असं ॲड. उज्ज्वल निकम यांनी यावेळी स्पष्ट केलं ;त्याचबरोबर विकसित भारताचा पाया ह्या आपल्या स्त्रिया आहे असं सुद्धा त्यांनी पुढे स्पष्ट केलं







