जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी हे भारत दौऱ्यावर आहेत . या भारत दौऱ्यात त्यांनी भारताचे संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंग यांची भेट घेतली. त्याचबरोबर त्यांनी भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची भेट घेतली .
जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी आणि भारताचे संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंग यांचा मध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेत;
दोन्ही देशातील संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यावर , दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर त्याच बरोबर इंडो-पॅसिफिक प्रदेशात अधिक स्थिरता ,
कश्या प्रकारे निर्माण करता येईल व कश्या प्रकारे अधिक सुरक्षेला चालना देता येईल आणि सहकार्याची नवीन क्षेत्रे निश्चित करता येईल या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली .
जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोइझुमी यांचा हा यांचा ह्या पहिल्या भारत भेटीत त्यांनी मुंबई येथील पश्चिम नौदल कमांडला सुद्धा भेट दिली.







