कामांची आपल्या राज्यात काही कमतरता नाही. प्रत्येक क्षेत्रात आज रोजगार आहे आणि तिथे मनुष्यबळाची सुद्धा आज आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे असं बघायला मिळत.
मात्र आपल्याकडील शिकलेल्या तरुणांची ते कामे करण्यासाठीची उदासिनता ही कित्येकदा आमच्या कडील मुलांना आणि मुलींना सुद्धा बेरोजगार ठेवण्यास कारणीभूत ठरतात.
प्रत्येक घरातून निघालेला मुलगा आणि मुलगी फक्त जर हाच विचार करत असेल की मला सरकारी नौकरी मिळायला हवी आणि त्यासाठी ते अनेको वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात घालवतात आणि घालवत असेल . त्यामध्ये सुद्धा मोजके मुलं हे निवडले जातात आणि असंख्य युवक दरवर्षी वगळले जातात.
आणि त्या निवडी मध्ये सुद्धा ह्या गटाचे इतके, त्या गटाचे तितकेच मूलं उचलले जातील ह्या प्रकारची व्यवस्था निर्माण केल्या गेली आहे. त्यामुळे चांगले गुण मिळवून सुद्धा अनेकदा मूलं, जेवढ्या पदांसाठी भरती निघाली आहे त्या पेक्षा अधिक घेतले जाणार नाही ह्या मुळे, त्यांच्या समोर काही पर्याय उरत नाही. आणि ते स्पर्धा परीक्षांचा तयारीला लागलेले असतात. आणि इकडे त्यांचे रोजगार, बाहेरच्या राज्यातील मूलं मोठ्या प्रमाणात येऊन मिळवतात. हि सत्य परिस्थती आहे .
तर त्यांना सुद्धा दोष देणे चुकीच असतं. कारण आपल्याकडे रोजगार आहे मात्र आमचे युवा आणि लोकं काम करायला तयार नाही. तिकडे बाकीच्या राज्यात रोजगार नाहीत. जाती व्यवस्थेमुळे त्यांच्या राज्यात आता सुद्धा भेदभाव होतो तर ते लोकं इकडे येऊन छोटे मोठे कामधंदे करतात . कारण भाजीभाकरी साठी तरी पैशे मिळवणे प्रत्येकाला आवश्यक असतं .
तर हे लोक आणि युवक छोट्या मोठ्या कारखान्यांत आणि खाजगी कंपन्यात सुद्धा निसंकोचपणे कामाला लागतात आणि बर्यापैकी इकडे येऊन कमाई करतात आणि आपल्या परिवाराचा गाडा चालवतात. ते येऊन त्याचबरोबर छोटे मोठे व्यवसाय करतात आणि त्यात सुद्धा ते समोर जातात.
आणि आपल्याकडील लोकं आणि युवक संकुचित वृत्तीने जगत असतात.
त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात आपल्याच मुलांच होत.
अनेको वर्षे स्पर्धा परीक्षांचा तयारीसाठी घालविल्यानंतर दुसर काही कौशल्य आम्ही आत्मसात करू शकलो नाही तर त्यांच्या समस्या वाढतात. आणि बेरोजगार राहाव लागत.
आपल्याकडील मुलांची मानसिकता ही आपल्याकडील रोजगार मिळविण्याची नसल्यामुळे, मोठ्या प्रमाणात किंवा नवीन काही काम धंधे शिकण्याची नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना बेरोजगार रहाव लागत.
आणि जरी शासन म्हणते की आम्ही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करत आहोत तर त्यामध्ये कदाचित आपल्याकडील रोजगार मिळविण्यात बाहेरच्या राज्यातील युवकांचा वाटा मोठा आहे आणि हे चित्र जमिनीवर सुद्धा दिसत जेव्हा आपन समाजात जरा फिरतो.
तर ही परिस्थिती बदलायला हवी तेव्हाच कुठे आपल्याकडील तरुणांच्या आणि युवकांच्या जिवनात चांगले बदल भविष्यात बघायला मिळतील.







