सोनं खरेदी करू नका , परदेशात प्रवास करू नका .पेट्रोलचा वापर कमी करा . खते आणि खादयतेलाचा वापर दैनंदिन जीवनात कमी करा . जमेल तर मेट्रो ने प्रवास करा आणि घरून काम करा .
ह्या काही गोष्टी जा पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांना करण्यास सांगितल्या हा काही उपदेश नाही तर हे मोदीजींचा सरकारचे अपयशाचे पुरावे आहेत ; असं मत काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मांडलं.
गेल्या काही वर्षात त्यांनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये;
हे आता त्यांना सांगावं लागत आहे अश्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या .
प्रत्येक वेळी आपली जबाबदारी टाळण्यासाठी ते जबाबदारी जनतेवर ढकलतात असं ते या वेळी म्हणाले .







