परराज्यातील उद्योग किंवा कारखाने यांच्या साठी जेव्हा राज्यामध्ये कोणतीही आडकाठी न येत असताना आणि बाहेरून आलेले धंदे आणि उद्योग वेगाने त्यांची भरभराट होत असतांना आणि त्यांच्या साठी अनुकूल वातावरण असतांना. जेव्हा आपल्या राज्यातील छोटे मोठे व्यवसाय किंवा व्यवसायिक आहेत किंवा होतकरू उद्योजक आहेत त्यांचा उद्योगांना जेव्हा योग्य प्रमाणात प्रोत्साहन मिळत नाही आहे आणि अशी जर परिस्थिती आहे.
तर अश्या परिस्थितीत आपल्याकडे फक्त भीक मागणारे, बेरोजगार, गरीब आणि कर्जबाजारी लोकं आणि रोजगार मागणारे असंख्य लोकच जागोजागी बघायला मिळतील आणि दरवर्षी मग डोळे बंद करून मग कर्जमाफी सुद्धा करावी लागेल. जर का आपल्याकडील लोकांचे छोटे मोठे व्यवसाय बुडायला लागले तर समोर त्या लोकांसमोर काही पर्याय राहणार नाही. व्यवसाय त्यांचे बुडालेले असणार तर मग दुसर्यांच्या दुकानात जाऊन त्यांना झाडू माराव लागेल नाही तर फरश्या पुसाव्या लागतील.
अनेक पिढ्या ज्या लोकांच्या परिवाराच्या ज्या एकाच मातीत गेल्या, तिथल्याच लोकांना जर का रस्त्यावर येऊन जगाव लागतं, ज्यांच्या जमिनी चालल्या जातात आणि उपाशी कर्जबाजारी बनून जगाव लागतं आणि आपल्याच राज्यात त्यांना जेव्हा पोरके पडल्यासारखे जगतात तर ही मोठी समस्या असते. राज्यातील तरुणांना त्यांचे छोटे मोठे व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळणे. त्यांना त्यांच्या छोट्या मोठ्या व्यवसायांमध्ये अडथळे न येऊ देणे किंवा न येणे आज आवश्यक आहे. वेगवेगळय़ा राज्यातून आणि परदेशातूनही मोठ्या प्रमाणात जेव्हा आपल्याकडे व्यवसाय येतात आणि बर्या प्रमाणात त्यांची भरभराट होते. मात्र आपल्या इकडच्या छोट्या छोट्या शहरातील गरीब घरातील किंवा सामान्य घरातील किंवा मग ज्यांचे वडिलोपार्जित सुद्धा व्यवसाय आहेत ते सुद्धा व्यवसाय किंवा त्यांचे व्यवसाय हे बुडू नये ही सुद्धा काळजी घेणे जितकी त्या लोकांची आहे तितकीच शासनाची सुद्धा असते.
मात्र बाहेरून व्यवसाय येऊन जर का राज्यात बर्यापैकी त्यांची भरभराट होत आहे आणि इथल्याच गोरगरीब जनतेला, सामान्य जनतेला किंवा छोट्या, मोठ्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि समस्यांना सामोरे जाव लागत आहे तर ही नक्कीच सगळ्यांसाठी चिंतेचे बाब असते. या परिस्थितीमध्ये सुधारना होने पुढे आवश्यक असते. राज्यातील लोकांना गावा खेड्यातील किंवा छोट्या मोठ्या शहरातील किंवा शेतकरी किंवा गोरगरीब किंवा युवा यांना सर्वांना भाषेचा अडसर येऊ नये म्हणुन बॅंकांनी इंग्रजी सोबतच त्या राज्यातील स्थानिक भाषेमध्ये व्यवहार करणे, यात काहीच वाईट नसते त्याचबरोबर ज्या काही योजना लोकांसाठी आणल्या आहेत त्या योजना स्थानिक भाषेत सुद्धा लोकांसाठी समोर आणल्या तर अनेक लोकांच्या समस्या त्याद्वारे दूर होऊ शकतात.






