या दिवसांत वृत्तपत्र विकणार्या लोकांची पंचायत एवढी असते की काय म्हणाव. पक्ष आणि पुढारी राज्यात आणि देशात जरी अनेक असले तरी, काही काही पुढारी वृत्तपत्र वाल्यांना किंवा पत्रकारांना सुद्धा आवडत नाही.
मग जे लोकं त्यांना आवडतात मग त्यांचेच छायाचित्र पहिल्या पानावर, आतल्या पानावर आणि वाटेल त्या पानावर बर्यापैकी ते छापतात, कधी मिश्कीलपणे हसतानांचा कधी, हात वर करून लोकांना अभिवादन करतानाचा, कधी मन की बात करतानाचा. तर कधी कुठला!
आणि या दिवसांत काही काही वृत्तपत्र वाल्यांचा आवडता पुढारी असेल तर मग तो मोदी , दररोज एकाच व्यक्तिचे फोटो टाकले तरी काहीही चोथा नाही. कारण एक फोटो टाकला तरी, चार बातम्या त्या पक्षाचा त्यांचा कडे येतात अस काही त्यांचा अंदाज किंवा अनुमान असतो.
आणि त्यात काहीही वाईट नसते.आणि कधीकधी गावातील पुढाऱ्यांचे सुद्धा छायाचित्र टाकण्याच कष्ट आमचे हे वृत्तपत्र चालवणारे लोकं घेतात.
त्यातून सुद्धा बर्यापैकी कमाई होते अस समजून घेण्यात काहीही चुकीच नाही. मात्र जे परिश्रम करणारे अनेक पुढारी आहे त्यांनी कितीही लोकांसाठी काम केल असेल किंवा मग त्यांनी लोकांसाठी कितीही जमिनीवर कष्ट केले तरी त्यांचे काही छोटेसे लेख किंवा एखादी बातमी किंवा एखादा काळा पांढरा छायाचित्र टाकायला त्या वृत्तपत्रांमध्ये मात्र जागा नसते. अशी या दिवसांत परिस्थिति असते.
मात्र त्या एवजी कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी, किंवा केसाला लावायच्या तेलाचा बाटल्या, एखाद्या चूर्णाच्या डब्याची जाहिरात अश्या प्रकारच्या तेलाच्या डब्यांची किंवा बाटल्यांच्या जाहिरातीसाठी बर्यापैकी जागा उपलब्ध होताना दिसते.
कधी दुचाकी साठी, तर कधी चारचाकी छायाचित्रांसाठी सुद्धा बर्यापैकी जागा उपलब्ध होतांना दिसतात. त्याचसोबत गावातील आवडीचे मग काही पुढारी असेल ज्यांची वृत्तपत्र वाल्यांसोबत जर का मैत्री असेल तर त्या पुढाऱ्यांचे सुद्धा बर्यापैकी छायाचित्र आपल्याला या दिवसांत बघायला वृत्तपत्रांमध्ये मिळतात. वाघांचे, कुत्र्यांचे, मांजरांचे, माकडांचे सुद्धा छायाचित्र आपल्याला बघायला मिळतात. आज या जंगलात वाघ दिसला. आज या जंगलातून त्या जंगलात वाघ जात असल्याचे छायाचित्र सुद्धा बघायला मिळतात म्हणजे अशा प्रकारे वृत्तपत्रातील जागा भरण्याचा काही प्रकार बघायला मिळतो.
पहिला पान आपला आवडता पुढारी आणि त्याचे छायाचित्र, एक दोन पान सोडले की परत मग आवडत्या पुढाऱ्यांचे छायाचित्र तिथे दिसतील. मात्र अनेक महत्त्वाचे मुद्दे, लोकांचे मुद्दे, समाजातील कित्येक महत्वाचे मुद्दे तिथे दिसणार नाही. कित्येकदा या मुळे वाचकांची निराशा होतांना दिसते.
अनेकदा अनेक परिश्रम करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि पुढारी जमिनीवर लोकांसाठी काम करणार्या पुढाऱ्यांची वृत्तपत्रं कडून दाखल घेतल्या जात नाही. पूर्वी वृत्तपत्रांच काम वेगळ असायच या दिवसांत तो उद्देश कुठेतरी हरवल्या सारखा लोकांना जाणवतो.







