गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी जपान चा दौऱ्यावर आहेत. ‘व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट च्या प्रचारासाठी आणि जपानी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हा दौरा त्यांचा कडून करण्यात आला .
पुढील वर्षी जानेवारी मध्ये जानेवारीमध्ये गांधीनगर येथे होणाऱ्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटसाठी जपानमधून गुंतवणूक आणि भागीदारी वाढवणे हा त्यामागचा उद्देश आहे.
या जपान दौऱ्यात त्यांनी , टोकियो येथील जपानी कंपन्यांचा प्रमुख अधिकाऱ्यांशी भेट घेतली . या बैठकांमध्ये टेक्सटाईल्स ,केमिकल्स , लाईफ सायन्सेस,ग्रीन एनर्जी , क्लाउड कॉम्प्युटिंग आणि जीसीसी या क्षेत्रांवर चर्चा घडून आली .
गुजरातची औद्योगिक क्षेत्र मजबूत करण्याच्या आणि भारत व जपान आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे असं यावेळी गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी नमूद केलं .
गुजरात जागतिक गुंतवणूक आकर्षित करत आहे आणि तिचे आपल्या लोकांसाठी अर्थपूर्ण संधींमध्ये रूपांतर करत आहे असं सुद्धा ते पुढे म्हणाले .






