अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो हे भारताचा दौऱ्यावर आहेत . या भेटी मध्ये त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस . जयशंकर यांची मुंबईत भेट घेतली . दोन्ही नेत्यांमध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील व्यापार करारावर चर्चा या वेळी झाली .
त्याचबरोबर मुंबईतील त्यांचा या भेटीत, त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतली या वेळी , त्यांनी ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडिया येथे काही वेळ मुख्यमंत्र्यांसोबत घालवला .
या दरम्यान व्यापार, गुंतवणूक, उद्योग, तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्य करून आणि लोकांसाठी कषाय प्रकारे संधी निर्माण करता येईल आणि महाराष्ट्र व अमेरिकेची भागीदारी अधिक दृढ कश्या प्रकारे करता येईल या बाबत यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा पार पडली . या वेळी परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचा सोबत अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर सुद्धा उपस्थित होते .







