राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी संघटनांकडून गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूर येथे , शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येत होत ज्याची आज सांगता झाली .
या मध्ये शेतकऱ्यांचा आणि नेत्यांचा मागण्या होत्या कि राज्य सरकारने , शेतकऱ्यांना कोणतीही अट मधात न ठेवता सरसकट कर्ज माफी द्यावी .
राज्य सरकारने सुद्धा दोन लाखा पेक्षा कमी कर्ज असलेल्या सर्व शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत विना अट कर्ज माफी चे आश्वासन हे दिले आहे ;
ह्या मध्ये ५६ लाख हे एकूण लाभार्थी शेतकरी आहेत; त्यातील ४० लाख शेतकऱ्यांना विना अट सरसकट कर्जमाफीचा लाभ हा त्यांना मिळणार आहे असं राज्य सरकारच म्हणणं आहे .
त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पूर्वी कर्जमाफीचा फायदा मिळवला आहे आणि ज्यांचं पूर्वीच पीककर्ज थकीत असेल तर त्यांना सुद्धा उर्वरित थकबाकी भरल्यानंतर ५० हजार रुपयांची मदत हि राज्य शासनाकडून केली जाईल .
त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे दोन लाखांहून अधिक आहे आणि जर का त्यांनी थकबाकी भरली असेल, तर त्यांना सुद्धा दोन लाखांपर्यंतचा कर्जमाफीचा फायदा मिळेल असं राज्य शासन म्हणते .
जर का सरसकट कर्ज माफी हि सर्व लाभार्थ्यांना केल्या गेली तर जिल्ह्या सहकारी बँकांवर त्याचा अधिक ताण पडेल आणि त्या बुडतील त्याच बरोबर जिल्ह्या मध्यवर्ती बँक सुद्धा बुडतील असं राज्य शासनाचं म्हणणं आहे .
तिकडे शेतकऱ्यांचा सरसकट कर्जमाफी च्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते त्याच बरोबर शेतकरी नेते राजू शेट्टी, मराठा आंदोलक नेते जरांगे पाटील आणि काँग्रेस चे नेते सुनील केदार तसेच राष्ट्रवादीचे नेते सलील देशमुख आणि इतर नेते यांनी या आंदोलनात हजेरी लावली आणि आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांना पाठिंबा दर्शवला .
मात्र आज सकाळी मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांना आश्वासन दिल कि शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठीचे प्रयत्न हे सरकारकडून प्रामाणिकपणे सुरु आहेत आणि यातून नक्कीच योग्य तो मार्ग काढला जाईल आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफीचा प्रश्न हा सोडविल्या जाईल ;
त्यानंतर अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या आंदोलकांनी शेवटी अन्नत्याग आंदोलन हे मागे घेतलं. .







