महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या , संघाना, अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नुकताच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले .
यंदाचं महाराष्ट्र पोलीस क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हे मुंबई ला मिळाले होते आणि यजमान संघाने पुरुष आणि महिला या दोन्ही गटात उत्कृष्ट संघाचा पुरस्कार मिळविला . या यशाबद्दल मुख्यंमत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन्ही संघांचे अभिनंदन केले .
या वेळी खेळाडूंना, अधिकाऱ्यांना , आणि कर्मचाऱ्यांना संबोधन करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले कि , महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलापैकी एक असून , उत्कृष्ट पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलीस दलाकडे पहिल्या जाते आणि हि आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे अशे मत मुख्यमंत्र्यांनी या दरम्यान मांडले . त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस दल आधुनिकता व तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर करत आहे असं मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केलं
महाराष्ट्र ही देशाची आर्थिक व औद्योगिक राजधानी आहे. मात्र, येथील कायदा व सुव्यवस्था उत्तम असल्यामुळेच हे शक्य झाले आहे. अशी सुद्धा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात व्यक्त केल्या .
येणाऱ्या काळात गुन्हेगारी क्षेत्रातील आव्हानेही बदलताना दिसतील . सायबर क्राइम, नार्कोटिक्स अशा प्रकारची नवी आव्हाने जनतेसमोर येतील आणि या वेळी कितीही विपरीत परिस्थिती आली तरी त्यावर मात करून, सुराज्य निर्माण करण्याची जबाबदारी हि पोलीस दलावर असेल असं मत त्यांनी या दरम्यान आपल्या भाषणात अधिकाऱ्यांना, खेळाडूंना आणि कर्मचाऱ्यांना संबोधन करतांना मांडलं .
पुरस्कार विजेते संघ ह्या प्रकारे आहेत :
फुटबॉल (पुरुष) – नागपूर शहर
बास्केटबॉल (पुरुष) – नाशिक परिक्षेत्र
हँडबॉल (पुरुष) – मुंबई शहर
हॉकी (पुरुष) – कोल्हापूर परिक्षेत्र
बास्केटबॉल (महिला) – नागपूर शहर
व्हॉलीबॉल (महिला) – मुंबई शहर
तायक्वांदो (महिला) – पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
नेमबाजी स्पर्धेमध्ये मध्ये जा अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली ते अधिकारी :
उत्कृष्ट नेमबाज (DYSP ते DIG गट) – गजानन राजमाने (पोलीस अधीक्षक फोर्स वन, मुंबई)
उत्कृष्ट नेमबाज (DIG ते DGP गट) – कृष्ण प्रकाश (अप्पर पोलीस महासंचालक, फोर्स वन, मुंबई आणि प्रशिक्षण व खास पथके मुंबई )
ऍथलेटिकस मध्ये ज्यांना पुरस्कार मिळाले ते अधिकारी आणि कर्मचारी :
बेस्ट ॲथलिट (पुरुष) – सचिन नने (राज्य राखीव दल परिक्षेत्र)
बेस्ट ॲथलिट (महिला) – यामिनी ठाकरे (पुणे, पिंपरी चिंचवड)
संघ ज्यांना उपविजेतेपद मिळाले :
महिला सर्वसाधारण– पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
पुरुष सर्वसाधारण– एसआरपीएफ परिक्षेत्र
ज्यांना स्वर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले ते संघ :
महिला – मुंबई शहर
पुरुष – मुंबई शहर
या पुरस्कार समारंभाच्यावेळी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचा सोबत मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि राज्य मंत्री पंकज भोयर सुद्धा उपस्थतीत होते .







