२०१८ पासून मी बॅलेटपेपरवर निवडणुका व्हाव्यात यासाठी प्रयत्न करतोय. त्यावेळी मी देशातील अनेक नेते आणि निवडणूक आयुक्तांनाही भेटलो होतो. त्यावेळी मी काय बोलतोय हे लोकांना कळलं नाही ते आता कळत आहे ;
अश्या प्रकारचं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथील प्रेस क्लब चा इमारतीत ‘डान्स ऑफ डेमोक्रसी या छायाचित्रांचा प्रदर्शनाचा उदघाटनाला हजेरी लावली त्यावेळी व्यक्त केलं .
ते या दरम्यान म्हणाले कि ,मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकता असायला हवी. मी मतदान करतोय याचं समाधान मला असलं पाहिजे.
जगातील बहुतांश पुढारलेल्या देशांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होतं. फ्रान्समध्ये एका मतदाराने तक्रार केल्यानंतर तिथली ईव्हीएम मशीन्स बंद करून बॅलेट पेपरवर मतदान सुरू झालं;
मग भारतात ईव्हीएम मशिन्स कशाला हव्यात? अश्या प्रकारचा सवाल सुद्धा त्यांच्याकडून यावेळी प्रशासनाला विचारण्यात आला .







