भारत आणि न्यूझीलंड त्यांच्या आर्थिक भागीदारीत एका नव्या अध्यायाला उद्यापासून सुरवात करणार आहेत . दोन्ही राष्ट्रांसाठी हा एक महत्वपूर्ण दिवस असणार आहे .अशा प्रकारची भागीदारी मजबूत नेतृत्व आणि आकांक्षांना संधींमध्ये बदलण्याच्या दोन्ही बाजूकडील वचनबद्धतेवर आधारित असते .
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या दूरदृष्टीमुळे हा ऐतिहासिक करार शक्य झाला आहे अश्या प्रकारची भावना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली ,
त्यामुळे आपल्या लोकांना एकत्रित पणे प्रगती करण्यासाठी समृद्ध होण्यासाठी नवे मार्ग येणाऱ्या दिवसांत खुले होणार आहेत असं सुद्धा ते या वेळी म्हणाले ..
त्याचबरोबर न्यूझीलंडला होणाऱ्या निर्यातीवर कोणत्याही प्रकारचं शुल्क हे आकारल्या जाणार नसल्यामुळे हा मुक्त व्यापार करार , सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग शेतकरी, महिला, युवक आणि श्रम केंद्रित क्षेत्रांसाठी बऱ्याच प्रकारचा संधी निर्माण करेल .
त्यामुळे शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला, मसाले आणि इतर कृषी उत्पादनांसाठी व्यापक बाजारपेठ उपलब्ध होईल, सोबतच उत्पादकता सुधारण्यासाठी, उच्च उत्पन्नाला पाठिंबा देण्यासाठी आणि उपजीविका मजबूत करण्यासाठी ;
त्यामुळे सहकार्य मिळेल अश्या प्रकारची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी जनतेला आणि उद्योजकांना दिली .
यावेळी त्यांनी निर्यातदार, व्यावसायिक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि उद्योजकांना शुभेच्छा सुद्धा दिल्या ..






