दुष्काळ आता केवळ शेतकऱ्यांच्या बांधापुरता मर्यादित राहिलेला नाही; शहरांमध्येही परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. त्यामुळे पीक नुकसानीच्या पंचनाम्यांसोबतच दुष्काळग्रस्त भागात सर्वंकष उपजीविका सर्वेक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे; असं माझं ठाम मत आहे अश्या प्रकारची भावना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली .
बीड, लातूर, धाराशिव भागातून होणारे स्थलांतर, आयटीआयमधून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले कुशल कामगार आणि बचत गटांच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या महिला; यांचा या सर्वेक्षणात सर्व अंगांनी विचार झाला पाहिजे. अश्या प्रकारची भावना सुद्धा त्यांनी व्यक्त केली .
त्याचबरोबर उपजीविका सर्वेक्षणाच्या मुद्द्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा येणाऱ्या दिवसांत करणार असून केंद्र सरकारच्या स्तरावरही पाठपुरावा करणायचा प्रत्यत्न असणार आहे असं सुद्धा ते पुढे म्हणाले .







