दहीहंडीचा उत्सव म्हणजे केवळ उत्साह, जल्लोष आणि परंपरेचा सोहळा नाही; तर भगवान श्रीकृष्णाने दिलेल्या एकता, सर्वसमावेशकता, नीतिमत्ता आणि सत्याच्या विचारांना जनमानसात रुजवणारा हा उत्सव आहे.
अश्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडीनिमित्त मुंबईत विविध ठिकाणी दिलेल्या भेटी नंतर व्यक्त केली .
आपल्या संस्कृतीची ही चेतना सजीव रूपात अनुभवण्याची संधी मला मिळाली. तरुण गोविंदांचा उत्साह, त्यांनी उभे केलेले मानवी मनोरे, त्यांची एकी, शिस्त आणि परस्पर सहकार्याची भावना पाहून आनंद झाला असं सुद्धा ते यावेळी म्हणाले.
आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरांना सोबत घेऊन ही तरुण पिढी पुढे जात असल्याचे चित्र निश्चितच आश्वासक आहे. लहानग्या गोविंदांसोबत घालवलेले निरागस आणि आनंदाचे क्षणही मनाला विशेष भावले;
या पिढीकडे पाहून आपल्या परंपरांचे भवितव्य सुरक्षित हातात असल्याची खात्री वाटते. अश्या प्रकारचं मनोगत सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केलं .







