पारंपरिक वाध्य किंवा संगीतावर बंदी नाही . कायदेशीर मर्यादेत आवाज करणाऱ्या साऊंड सिस्टिमवर सुद्धा बंदी नाही .
मात्र तीव्र आवाज आणि कंपन निर्माण करणाऱ्या विशिष्ट साऊंड सिस्टिमवर कारवाई हि केल्या जाऊ शकते अशी माहिती नागपूरचे पोलीस आयक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नुकताच प्रसारमाध्यमांना दिली .
त्याच सोबत एकावर एक थर रचलेल्या मोठ्या डॉल्बी सिस्टीम (टॉप, मिड, डीप बेस), प्लाझमा आणि प्रेशरमिड साऊंड सिस्टीमच्या वापरावर हि बंदी असेल .
वाहनचालकांचे नियंत्रण सुटू नये व नागरिकांच्या डोळ्यांना इजा होऊ नये , म्हणून लेझर बीम आणि बीम लाईट्सवरही निर्बंध लागू असेल .
मात्र , ढोल ताशा बॅंड या प्रकारचा पारंपरिक वाद्यांवर कोणतीही बंदी हि घालण्यात आलेली नाही असं ते पुढे म्हणाले .
सर्वोच्च न्यायालय, पर्यावरण संरक्षण कायदा आणि ध्वनी प्रदूषण नियमानुसार ठरवून दिलेल्या डेसिबल (ध्वनी) मर्यादेत वाजणाऱ्या सामान्य साऊंड सिस्टीमवर कोणतीही बंदी नसणार आहे असं सुद्धा ते या दरम्यान म्हणाले .







