१८ वि ब्रिक्स परिषद हि भारतामध्ये, भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे १२ ते १३ सुप्टेंबर २०२६ या काळात होत आहे . या परिषदेचे यजमानपद यावेळी भारताला मिळालेलं आहे .
या परिषदेमध्ये वेगवेळ्या अकरा देशाचे राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी होत आहेत .
त्यामध्ये भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन .
चीन चे अध्यक्ष, शी जिनपिंग .
या परिषदेमध्ये संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष अँटोनियो गुटेरस हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत .
त्याचबरोबर ब्राझील, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, सौदी अरेबिया आणि यूएई या देशांचे प्रतिनिधी आणि राष्ट्रप्रमुख सुद्धा या परिषदेमध्ये या दरम्यान उपस्थित राहणार आहेत .
या परिषदेमध्ये , जागतिक आर्थिक वाढ आणि व्यापारी धोरणे . हवामान बदल आणि हरित ऊर्जा. डिजिटल सहकार्य आणि तंत्रज्ञान नवकल्पना . ग्लोबल साऊथचा समस्या आणि विकास ह्या प्रकारचे विषय हे चर्चेसाठी असणार आहेत .






