पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नेतृत्वाचा कालावधीत देशाने गरिबी निर्मूलन आणि वेगवेगळ्या क्षेत्रात होणार विकास अनुभवाला आहे . भारतातील ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य वाटप करणे असो;
अथवा देशात ९० हुन अधिक विमानतळे निर्माण करणे असो अथवा १४० वंदे भारत रेल्वे गाड्या सुरु करणे असो ४ कोटींहून अधिक कुटुंबाना कायमस्वरूपी घरे देणे असो किंवा १.४५ लाख किलोमीटरचे रस्ते आणि ३००० किलोमीटरचे आधुनिक द्रुतगती मार्ग बांधणे असो.
किंवा ५० कोटी लोकांना ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा आणि १० कोटींहून अधिक कुटुंबांना गॅस कनेक्शन देणे असो, किंवा भारताला जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनवणे असो;
मोदीजींनी या १२ वर्षांत एकही दिवस सुट्टी न घेता देशाची आणि नागरिकांची अविरत सेवा केली आहे. असे बदल तेव्हाच शक्य होतात,
जेव्हा नेतृत्वाचा हेतू स्पष्ट असतो, ध्येय राष्ट्रीय हिताचे असते आणि समर्पण पूर्ण असते अश्या प्रकारचं मनोगत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान पदाचा १२ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याचा निमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना व्यक्त केले .







