अनेक दशकांपासून महिला आरक्षण हे केवळ एक आश्वासन राहिले आहे.सध्याचा सरकारने ते प्रत्यक्षात उतरवले आहे अश्या प्रकारचं मत केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी मांडलं .
ते पुढे म्हणाले कि आम्हाला वाटत कि आपल्या नारीशक्तीला येणाऱ्या काळात योग्य प्रतिनिधित्व मिळावे त्याचबरोबर त्यांना आणखी अनिश्चिततेत ढकलले जाऊ नये, हे सुनिश्चित करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित आवश्यक दुरुस्त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत अश्या प्रकारचं मत त्यांनी मांडल .
ते पुढे म्हणाले कि त्यांनी स्वतःहून सर्व पक्षांच्या नेत्यांशी संपर्क साधलेला आहे, त्याच बरोबर त्यांना पत्र सुद्धा लिहिले आहे आणि त्यांच्याशी चर्चा केली आहे. संवाद झाला आहे आणि तो सुरू आहे.
पण एका टप्प्यावर, हेतूचे कृतीत रूपांतर झालेच पाहिजे या प्रकारचं मत त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल वर मांडलं .
प्रक्रियेच्या नावाखाली अंमलबजावणीला विलंब करणे म्हणजे लाखो महिलांना मिळणाऱ्या न्यायाला विलंब करण्यासारखेच आहे असं ते महिला आरक्षणाचा मुद्द्यावर बोलतांना म्हणाले .







