पश्चिम बंगाल मध्ये विधानसभेचे वारे सुरु आहेत . त्यामुळे सर्वच पक्षांकडून तिथे जोरदार प्रचार हा करण्यात येत आहे . भाजप असो किंवा काँग्रेस असो कि मग TMC असो, त्यामुळे प्रत्येक पक्षाचा नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बराच उत्साह ह्या दरम्यान बघायला मिळत आहे.
काँग्रेस चे कार्यकर्ते , TMC चे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात ह्या दरम्यान प्रचारात उतरत आहे असं चित्र बघायला मिळत .
या दरम्यान , भाजपचे जेष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा पश्चिम बंगाल मध्ये प्रचारासाठी उतरले आणि त्यांनी तिथे प्रचार केला आणि या दरम्यान रस्त्याचा कडेला असलेल्या दुकानात त्यांनी , झालमुडी नावाचं खायध्यपदार्थ खाण्याचा आनंद घेतला .
त्याचे छायाचित्र हे जेव्हा , समाज माध्यमावर आलेत, तेव्हा बंगालच्या नेत्या आणि TMC च्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी , नरेंद्र मोदी यांचा वर ताशेरे ओढताना , म्हंटल कि , मोदींचा हा फक्त ड्रामा आहे . मोदींचा ह्या नाटकाला बंगाली जनता बऱ्या प्रकारे समजतात आणि ते बंगाली जनतेला मूर्ख बनवू शकणार नाही.
यावेळी मोदी यांनी या रॅली दरम्यान बंगाली जनतेला , ममता राज संपवण्याचा आणि भाजपाला निवडून आणून बंगाल मध्ये अच्छे दिन परत आणण्याचं आवाहन केलं .
मात्र आता हे बंगली जनतेचा हाती कि कोणामुळे त्यांचा राज्यात अच्छे दिन येऊ शकतील .






