काहीकाही गोष्टी पटणार्या नसतात. मात्र तरी सुद्धा आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत पुढे जात राहतो! तर अश्या प्रकारची भावना घेऊन अनेक जण त्या अनेक अडचणींना सोबत घेऊन जीवन जगत असतात आणि त्या समस्यांना सामोरे जात असतात . असं काहीस चित्र आपल्याला आपल्या समाजात बघायला मिळत .
त्या मध्ये सगळ्याच वर्गातील लोकांचा समावेश असतो . सगळ्यांचा समस्या ह्या वेगळ्या असतात . मात्र समाजात अधिक प्रभावित जर झालेला वर्ग कोणता आम्हाला दिसतो तर तो , शेतकरी वर्ग जो जगाचा पोशिंदा आहे असं आपण म्हणतो .
मात्र त्या आमचा असंख्य शेतकर्यांचा समस्या आम्हाला दररोज दिसत असतात , कधी कधी ते एखाद्या संपाचा वेळी आणि उपोषणाचा वेळी ते एकवटात त्या वेळी आपल्याला आणि आपल्यातील अनेकांना जराशी कल्पना येते कि किती मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या समस्यांनी त्रस्त आहेत. मात्र त्यांचा समस्या ह्या कमी न होता वाढत जात आहे अश्या प्रकारचं चित्र सुद्धा आपल्याला या दरम्यान अनुभवायला मिळत.
त्याच बरोबर , मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आज त्रस्त दिसतात , त्यांचे प्रश्ण जवळपास सर्वांचे सारखेच असतात, ते म्हणजे त्यांना जीवनात सर्वांना समोर जायच असते. आणि हि अतिशय सुंदर बाब आहे कि आज आमचा मुलांना आणि प्रत्येकाला समोर जावसं वाटत .
या काळात आपल्याला बघायला मिळत कि मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रातून शिक्षण घेऊन समोर येत आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगाराचे, त्यांचा भविष्याचे, त्यांचा अन्ना पाण्याचे प्रश्न आणि पुढील आयुष्य कशा प्रकारे जगायचे हे प्रश्न त्यांना सहज पडताना दिसतात . कारण त्यांना अवती भवती आणि आपल्या समाजातील परिस्थिती किती आव्हानात्मक आहे ह्याच चित्र हे दररोज दिसत असत .
त्यामुळे त्यांचा चिंता ह्या वाढताना दिसतात; त्यांचा आई वडिलांचा चिंता ह्या वाढताना दिसतात ; कारण मुलांचा शिक्षणासाठी अनेक आई वडिलांनी कष्ट केलेले असतात . त्याचबरोबर कठीण परिस्थतीत सुद्धा आपल्या कडे जे थोडे बहुत काही पैसे असेल ते लावून किंवा कर्ज घेऊन त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं असते . मात्र समाजातील परिस्थिती आव्हानात्मक असल्यामुळे त्यांचा चिंते मध्ये भर पडलेली दिसते .
तिकडे दुसऱ्या बाजूला , खालपासून वर पर्यंत भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि तो या ना त्या मार्गाने आणि पडद्याआडून सुद्धा होताना दिसतो. त्यामुळे जे हजारो मूलं, लाखांत त्यांची संख्या आहे आणि ते शिकलेले आहेत फक्त असही नाही, ते हुशार सुद्धा आहेत असं आपल्याला बघायला मिळत , मग ते कोणत्याही जातीचे का असॊनात.
मात्र मागील काळात , जातीय व्यवस्थेने भारतीय समाजातील अनेक पिढ्या अक्षरशः बरबाद केल्यामुळे आज आपल्याला कठीण आणि आव्हानात्मक परिस्थिती बघायला मिळते ; आज जिकडे तिकडे जे मोठ्या प्रमाणात मुलं स्पर्धा परीक्षेसाठी वर्षोनुवर्षे तयारी करतात ;त्यातले खूपशे काही संपन्न किंवा श्रीमंत घरातून येतात असही नाही.
हे मूलं, गरिबांची, शेतकर्यांची, आदिवासींची, सुतारांची, मेंढपाळांची भटक्या समाजाची मुले, चांभाराची , मेहतरांची आणि अश्या अनेक जातीतील अनेको वर्षे ज्यांचा वर अन्याय झाला त्यांची मूल जेव्हा त्यांचा कडे काही पर्याय नाही. खायला घरी अन्न नाही, घरी दारिद्ऱ्या शिवाय काही नाही;
अशी मुले येऊन तिथे अनेको वर्षे कष्ट करतात. अशी विदारक आणि कडवट परिस्थिती आपल्याला अनुभवायला मिळते आणि अश्या परिस्थिती मध्ये सुद्धा ते पट्ठे परिश्रम करत असतात आणि हे अतिशय सुंदर आणि प्रेरणा देणार चित्र आपल्याला तिथे बघायला मिळत असत .
कारण त्या असंख्य मुलांकडे दुसरा कोणता पर्याय नसतो. बाकीचे संपन्न व श्रीमंत घरातील मूलं जातीचा इकडून तिकडून आणि पडद्याआडून फायदा घेऊन पुढे निघून जातात आणि यांना कित्येकदा अप्रत्यक्षपणे मदत होत असते असा अनुभव सुद्धा येतो .
अनेको वर्षे खितपत पडलेल्या जातीतील असंख्य मुलं यांचा फायदा हा कित्येकदा पुढाऱ्यांकडून त्यांचा नकळतपणे त्यांचा फायद्या साठी घेतला जातो तर अश्या प्रकारचं वेदनादायी चित्र आपल्याला बघायला मिळत . या असंख्य मुलांकडे एकवेळचे खायला पैशे नसतात आणि तिकडे यांना मेंढरांसारखं आणून बसवल्या जात ; त्यांना त्या दरम्यान कधी कधी खायला प्यायला दिल जात आणि आपला उद्देश्य साध्य झाला कि , रहा मग तुम्ही संघर्ष करत अश्या प्रकराची त्यानंतर अनेकांची भूमिका असते, ते आपला मतलब सध्य करून निघून जातात , मात्र त्यानंतर सुद्धा यांचा संघर्ष हा सुरूच राहतो.







