महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांनी नुकताच चंद्रपूर येथील मुल या आपल्या वडिलोपार्जित गावी भेट दिली.
आपल्या वडिलोपार्जित गावी भेट देणे हा नेहमीच भावनिक अनुभव असतो , कारण आपल्या गावात बालपणी घालवलेल्या अनेक आठवणी तेव्हा जाग्या होतात .
आपले कुटुंब , आपली भावंडे आणि माजी मंत्री शोभा काकू फडणवीस स्थानिकांसोबत घालवले क्षण हे माझासाठी अविस्मरणीय आहेत;
ह्या प्रकारचा भावना यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गावी भेट दिल्यानंतर व्यक्त केल्या .
या ठिकाणी येण्याचा प्रत्येक योग हा माझे ह्या भूमीशी असलेले ऋणानुबंध आणखी दृढ करते असं ते यादरम्यान म्हणाले .
या भेटीमध्ये त्यांनी , दुर्गामातेचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले , त्याच बरॊबर सतचंडी यज्ञात सुद्धा त्यांनी सहभाग घेतला;
हा अनुभव अत्यंत आत्मिक आणि समाधान देणारा होता असं ते या दरम्यान म्हणाले .







