महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी असून जागतिक गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र सज्ज आहे. महाराष्ट्राला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा, नैसर्गिक बंदरे, मजबूत औद्योगिक पायाभूत सुविधा आणि निर्यातीसाठी उपलब्ध असलेली अनुकूल व्यवस्था,
यामुळे पोर्ट इंडस्ट्रीसाठी महाराष्ट्र हे महत्त्वाचे केंद्र ठरू शकते या प्रकारचे मत मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितीश राणे यांनी फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या वतीने
नेस्को, गोरेगाव येथे २ ते ४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान आयोजित चौथ्या मेरीटाईम इंडिया कॉन्फरेन्स अँड एक्स्पो २०२६ आयोजित परिषदेदरम्यान व्यक्त केले .
या क्षेत्रात तब्बल ७६ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आली असून, गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी वन विंडो क्लिअरन्स सारख्या सुविधांवर सुद्धा भर दिला जात आहे असं सुद्धा त्यांनी यादरम्यान स्पष्ट केलं .
त्याचबरोबर मुंबई वॉटर मेट्रोसारख्या आधुनिक जलवाहतूक संकल्पना, बंदरांची क्षमता वाढविणे, शिपिंग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा विस्तार करणे; तसेच निर्यातीला चालना देणे, या माध्यमातून महाराष्ट्राच्या मेरिटाइम क्षेत्राला नवी दिशा देण्याचा शासनाचा प्रयत्न असणार आहे .
त्यामुळे भारताची सागरी क्षमता वाढविण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे केवळ उद्योगांचाच विस्तार होणार नाही;
तर राज्यात सुद्धा रोजगाराच्या नव्या संधी सुद्धा त्यामुळे निर्माण होतील. या प्रकारची भावना त्यांनी या दरम्यान मांडली.






