२३ वी भारत-आसियान शिखर परिषद , १७ नोव्हेंबर २०२६ रोजी फिलीपिन्सची राजधानी मनिला येथे पार पडली या परिषदेमध्ये फिलीपिन्सचे अध्यक्ष फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर यांच्या निमंत्रणावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेत सहभाग घेतला होता .
या परिषदेचे अध्यक्षपद हे फिलीपिन्सने या वेळी भूषवले होते आणि भारतासाठी समन्वयक देश म्हणून भूमिका पार पडली . या परिषदे मधील आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी मुक्त, खुल्या आणि नियम आधारित हिंद प्रशांत क्षेत्रावर भर कशा प्रकारे दिला जाऊ शकतो ह्या वर आपले विचार मांडले .
या दरम्यान ते म्हणाले कि या प्रदेशाचे भविष्य स्पर्धेवर नाही तर एकमेकांचा परस्पर सहकार्यावर अवलंबून आहे .या परिषदेमध्ये सर्व ११ आसियान सदस्य देशांचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
त्यामध्ये इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, सिंगापूर चे पंतप्रधान लॉरेन्स वोंग , थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चार्नविराकुल, व्हिएतनाम पंतप्रधान ले मिन्ह हंग. मलेशिया चे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांचा आणि इतर आसियान देशांचा प्रतिनिधींनी आणि नेत्यांनी या परिषदमध्ये सहभाग घेतला होता हे विशेष .






