नुकताच झालेल्या महाराष्ट्राचा अर्थ संकल्पात विदर्भाचा विकासासाठी जरासा विचार करण्यात आलेला दिसत आहे . नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील पर्यटनाला चालना मिळावी आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व्हावी या करीता
नवरगाव, रामटेक येथे चित्रनगरी विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ..
त्याच बरोबर नागपूरसह विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीला वेग मिळावा म्हणून नवीन नागपूर मध्ये व्यापार व वित्तीय केंद्र उभारण्याचा निर्णय सुद्धा या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे . या प्रकाची भावना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली .
त्याच बरोबर ते म्हणाले कि मुंबई महानगराच्या धर्तीवर नागपूरला महत्त्वपूर्ण ग्रोथ हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे .
सार्वजनिक आरोग्य क्षेत्राच्या सर्वंकष विकासासाठी एम्स, आय आय एम यांच्या धर्तीवर उच्च दर्जाचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र उभारण्यासाठी भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या सहकार्याने
नागपूर येथे महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था स्थापन करण्यात येणार आहे असं ते म्हणाले .
त्याचबरोबर नागपूर मधील मिहान येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेसाठी निधीची तरतूद करून नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचे संशोधन, अभ्यास आणि प्रभावी व्यवस्थापन यावर भर देण्यात येणार आहे असं ते या दरम्यान म्हणाले .
या सर्व निर्णयांमुळे नक्कीच नागपूरचा आणि विदर्भाचा विकासाला गती मिळेल असं मत त्यांनी त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल वर मांडलं







