या दिवसांत काही ठिकाणी रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी बघायला मिळते या मुळे दररोज प्रवास करणाऱ्या लोकांना मोठं परिश्रम करून , धक्के खात खात रेल गाड्यांचा डब्यांमध्ये चढताना आणि उतरताना आपल्याला बघायला मिळत.
आणि काही ठिकाणी, काही रेल्वे स्थानकांवर या दिवसांत इतकी गर्दी असते की लोकांना तिथे उभे राहायला किंवा बसायला सुद्धा जागा मिळत नाही त्या मुळे लोकांची प्रचंड फजिती हि होताना दिसते.
त्याचबरोबर ह्या प्रकारचं चित्र काही भागांमध्ये दररोजच झालेलं आहे असं लोकांना अनुभवायला मिळत त्यामुळे तिथली परिस्थिती बघितली कि अनेक वर्षांपासून तिथल्या परिस्थिती मध्ये काही बदल आलेला नाही असं वाटत .
लोकं तिथे दररोज बकऱ्या मेंढ्यांप्रमाणे या रेल्वे
गाड्यांमधून प्रवास करत असतात ; कदाचित त्यांनाही अपेक्षा असते की कधी ना कधी ही परिस्थिती बदलेल.
परंतु काही भागांमध्ये, बराच काळ सकारात्मक बदल दिसत नाहीत; काही शहरांमध्ये, लोकसंख्येच्या वाढीचा दर अधिक असल्यामुळे काही शहरांमध्ये अश्या प्रकारची परिस्थती हि लोकांना अनुभवायला मिळते .
परंतु जर रेल्वे स्थानकांवरील गर्दी सातत्याने वाढतच आहे आणि लोकांना बसायला, उभे राहायला किंवा डब्यात चढायला किंवा उतरायलाही जागा मिळत नसेल तर हि अनेक प्रवाश्यांसाठी मोठी समस्या असते .
दररोज लाखो लोकं रेल्वेने देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात आणि हे लाखो करोडो लोकं रेल्वे विभागाच्या आणि सरकारच्या तिजोरीत मोठी भर घालत असतात.
मात्र असं असलं तरीही, लोकांना अनुभवायला मिळते कि ज्या प्रकारची सेवा आणि सुविधा लोकांना आणि प्रवाशांना सरकारकडून आणि रेल विभागाकडून मिळायला हवी , ती अनेक भागात मिळताना दिसत नाही .







