जगभरातील लोकांचा दिवसाची सुरवात हि कॉफीचा पहिल्या घोटाशिवाय होत नाही . माझासाठी दिवसाची सुरवात हि अराकू ने होते . हि आंध्रप्रदेशचा समृद्ध वारशाची चव आहे;अश्या प्रकारची भावना आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आंतरराष्ट्रीय कॉफी दीना निमित्त मांडली त्यांनी या दरम्यान आंतरराष्ट्रीय कॉफी दिनाचा सर्वाना शुभेच्छा सुद्धा दिल्यात.
पुढे ते म्हणाले कि , आम्ही अराकूला जागतिक कॉफी केंद्र बनवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्या राज्याचा टेकड्यांपासून ते जगभरातील लोकांचा चहाचा कपापर्यंत पोहचलेल्या अराकू कॉफीचा अविश्वसनीय प्रवासाचा आम्ही यंदा उत्सव साजरा करत आहोत.
त्याचबरोबर अराकूला जागतिक कॉफी केंद्र बनविण्यासाठी गुंतवणूक सुद्धा करत आहोत अश्या प्रकारची भावना या वेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय कॉफी दिनानिमित्त मांडली .
आमचा स्थानिक उत्पादनांना सक्षम करणे आणि स्थानिक उत्पादनांना जागतिक नकाशावर आणणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे असं सुद्धा ते आंतरराष्ट्रिय कॉफी दिनानिमित्त आपलं मत मांडताना म्हणाले.
अराकू कॉफी ही आंध्र प्रदेशातील पूर्व घाटातील अराकू खोऱ्यात आदिवासी शेतकऱ्यांकडून पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उगवली जाणारी जागतिक दर्जाची कॉफी आहे. ही कॉफी आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम आणि ओडिशा परिसरातील डोंगराळ भागात घेतली जाते .या दरम्यान रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर केला जात नाही; नैसर्गिक खत आणि सेंद्रिय पद्धतीने याची लागवड केली जाते.







