महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे त्याचबरोबर .
जिल्हाधिकाऱ्यांकडून दिली जाणारी अकृषक म्हणजे NA परवानगी रद्द करण्यात आली असून वार्षकि NA कर सुद्धा महसूल विभागाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती समाजमाध्यमावर महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी जनतेला दिली .
या निर्णयामुळे जमीन व्यवहार हा अधिक जलद, सुलभ, पारदर्शक आणि वेगवान होणार असून त्यामुळे विकास प्रक्रियेला अधिक गती मिळेल असं महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले .
तसेच यामुळे सर्वसामान्य लोकांना होणारी धावपळ , वेळ व खर्च सुद्धा या प्रक्रियेमुळे वाचणार आहे आणि या मुळे त्यांना पुढे अधिक दिलासा मिळणार आहे अश्या प्रकारची माहिती चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी जनतेला दिली .







