जेव्हा कित्येक प्रगत देश सौर ऊर्जेच्या आणि पवन ऊर्जेच्या द्वारे ऊर्जा निर्माण करण्यावर भर देत असतांना आपल्याकडे मात्र कित्येक क्षेत्रात आता सुद्धा
मोठ्या प्रमाणात जुन्या ऊर्जेच्या माध्यमांवर लोकं मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे अस बघायला मिळत.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज सुद्धा अनेक क्षेत्रात लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
अनेक उद्योगधंद्यांना छोटे किंवा मोठे यांना पुरेशी वीज दररोज उपलब्ध होऊ शकत नाही. शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात अनेक खेडे गावांत कित्येकदा दररोज वीज सातत्याने खंडित होण्यामुळे कित्येकदा समस्यांना सामोरे जाव लागत.
त्यामुळे अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध असलेल्या वेगळया ऊर्जा साधनांचा उपयोग करण्यावर लोकांनी आज भर देणे आवश्यक आहे अस वाटत.
दिवसातून कित्येकदा वीज खंडित होण्यामुळे अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच मोठ नुकसान होतं आणि शेतकर्यांच सुद्धा मोठ नुकसान दररोज होत आहे अस आपल्याला अनुभवायला मिळते.
त्यांच्या शेतात वाढवलेल्या पिकांसाठी त्यांना मुबलक प्रमाणात पाणी देणे आवश्यक असते मात्र त्याप्रमाणात ते पाणी त्यांच्या पिकांना देऊ शकत नाही, कारण आठवड्यातुन कित्येकदा गावा खेड्यात आणि छोट्या मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा सातत्याने वीज खंडित होण्याच्या समस्या असतात.
कित्येकदा वीज गेली की ती दिवसभर येत नाही हे सुद्धा आपल्याला बघायला मिळते आणि ही त्यांच्या साठी मोठी समस्या असते. गुरांना पाणी घालण्यासाठी सुद्धा त्यांना पाण्याची आवश्यकता असते. आणि या दिवसांत ज्याप्रकारे पाण्याचे साठे हळूहळू कमी होत चालले आहे त्या मुळे त्यांना भूगर्भातील पाण्याचा साठ्यांवर अवलंबून रहाव लागत आणि ते पाणी मिळविण्यासाठी त्यांना विजेची आवश्यकता असते.
मात्र आपल्याकडे वीज गावोगावी मोठ्या प्रमाणात खंडित होतांना दिसते आणि कित्येकदा वीज कर्मचारी खांबावर दुरुस्ती करून गेले तरी परत काही दिवसांनी त्याच समस्या उद्भवतांना दिसतात त्यामुळे मग व्यावसायिकांचे, शेतकर्यांचे आणि सामान्य नागरिकांच्या समस्या वाढतांना दिसतात.
घरातील, पंखे, फ्रीज, मिक्सर, कुलर, ऐसी, हिटर, कम्पुटर, लैपटॉप, वॉशिंग मशीन ह्या सर्व गोष्टी दिवसभर आणि संपूर्ण दिवस वीज खंडित राहिल्या मुळे काम करू शकत नाही. त्यामुळे गृहिणींच्या समस्या वाढतात.
विजेवर अवलंबून असणारे अनेक कार्य ही थांबतात आणि त्याचा परिणाम अनेक खाजगी कंपन्यांना होतांना दिसतो. त्यामुळे खाजगी कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागतो.
ज्यांची ऐपत दररोज नुकसान सहन करून सुद्धा आपला व्यवसाय सुरू ठेवण्याची आहे त्यांना त्यामुळे फरक पडत नाही मात्र छोटे मोठे धंदे आणि व्यवसाय या मुळे बुडतात. त्यामुळे आज आपल्याला नवनवीन ऊर्जेच्या साधनांच्या अधिकाधिक वापराकडे लक्ष देणे आज आवश्यक आहे अस वाटत. त्यामुळे हळूहळू चांगले बदल लोकांना, व्यावसायिकांना आणि शेतकर्यांना सुद्धा बघायला मिळतील आणि याकडे शासनाने सुद्धा लाक्ष घालणे आवश्यक आहे.
जेव्हा आजूबाजूचे देश मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेवर आणि पवन ऊर्जेवर आपल लक्ष केंद्रित करताना दिसतायत आणि ऊर्जा निर्मिती करतांना दिसतय तर आपल्याकडे मात्र या साधनांवर अधिक बोलल्या जात नाही आहे आणि त्याप्रकारे लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच काम होत नाही आहे अस बघायला मिळत आहे.
मात्र या प्रकारे लोकांचे, सामान्य नागरिकांचे, शेतकर्यांचे सुद्धा प्रश्ण कमी होऊ शकतात आणि सुटू शकतात.







