राष्ट्रीय पत्रकार दिवस आहे आज अस कळल, इकडे तिकडे सगळी कडे पत्रकारांना लोकं शुभेच्छा देत आहेत हे सुद्धा बघायला मिळाल.
आनंद वाटला आणि जरा वाटल की काय आजकाल आपल्या वृत्तपत्रांची आणि माध्यमांची अवस्था आहे ह्यावर काही जरा काही बोलाव.
ह्या दिवसांत म्हणायला आपल्याकडे कित्येक भाषेत वृत्तपत्र निघतात कधी मराठी वृत्तपत्र हातात येतो. कधी इंग्रजी वर्तमानपत्र हातात येतो तर कधी हिंदी वृत्तपत्र हातात येतो.
तर कधी गुजराती वृत्तपत्र दिसतात आणि कधी बंगाली वृत्तपत्र दिसतात आणि कधी मल्याळी तर कधी तेलुगू वर्तमानपत्र दिसतात तर कधी इंग्रजी वृत्तपत्र सुद्धा दिसतात. आता त्याला लोकं सुद्धा काय करणार.
आपल्या कडे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळया भाषा लोकं बोलतात आणि आपल्याकडे सुद्धा त्या प्रकारच्या भाषेमध्ये बोलणारे लोकं दिसतात.
कधी कोणी बिहारी मध्ये बोलतो, तर कधी कोणी बंगाली मध्ये बोलतो तर कधी कोणी इंग्रजी मध्ये बोलतो तर कोणी तेलगु किंवा मल्याळी मध्ये बोलतांना दिसतो.
तर कोणी पंजाबी मध्ये बोलतांना दिसतो. बसस्थानकावर, रेल्वे स्थानकावर, भाजी बाजारात, पान ठेल्यावर, विमानतळावर, दुकानात, लोकं तुम्हाला वेगवेगळया भाषेत बोलताना दिसतात.
म्हणजे आपल्याकडे भाषेमध्ये वैविध्यता बघायला मिळते. त्यामुळे मग आपल्याकडे एक किंवा दोन भाषेत वृत्तपत्र बघायला मिळत नाही. आणि त्याप्रकारचे प्रसारमाध्यमे सुद्धा आपल्याला बघायला मिळतात.
वेगवेगळ्या भाषेत वृत्तांकन करणारे पत्रकार आणि बातम्या वाचणारे न्यूज रीडर सुद्धा असतात.
कित्येक भाषेमध्ये जेव्हा वृत्तपत्र बघायला आणि वाचायला लोकांना मिळते आणि त्यातून त्यांना समाजाबद्दल, राजकारणाबद्दल, खेळांबद्दल, मनोरंजन क्षेत्राबद्दल, अर्थ विश्वाबद्दल माहिती मिळत असते.
या क्षेत्रात असलेल्या लोकांना प्रचंड धावपळ आणि परिश्रम सुद्धा कराव लागत अस सुद्धा बघायला आणि अनुभवायला आपल्याला मिळते.
लोकांच्या अपेक्षा सुद्धा या दिवसांत खूप असतात. वृत्तपत्रांच, प्रसारमाध्यमांच् काम हे प्रामाणिकपणे सत्य लोकांपर्यंत पोहचवणे हे असते.
मात्र या दिवसांत कित्येकदा वृत्तपत्रांकडून सुद्धा चाटू गिरी केल्या जात आहे अश्या प्रकारच चित्र हे बघायला मिळत.
आपल्याला आवडणारे नेते आणि किंवा पुढारी यांच्या मागे या दिवसांत प्रसारमाध्यमे लागलेले दिसतात आणि त्यांच्याबद्दलच नियमितपणे लिखाण व वृत्तांकन केल्या जात आहे किंवा बोलल्या जात आहे अस आपल्याला अनुभवायला मिळते.
अनेक चांगले काम करणारे पुढारी आणि लोकं अश्या प्रकारे लोकं समोर येत नाही.
आता जे पुढारी किंवा नेते लोकं त्यांना आवडत नाही त्यांच्या बद्दल अधिक काही बोलल्या जात नाही त्यांच्या मुद्द्यांना मह्त्व दिल्या जात नाही.
तर अश्या प्रकारे कित्येक चांगले लोकं समाजाला दिसत नाही किंवा त्यांच् म्हणण किंवा त्यांच काम लोकांपर्यंत पोहोचत नाही.
कारण एकतर ते कदाचित त्यांच्याकडून या लोकांना पैसा मिळत नसावा किंवा ते लोकं यांना आवडत नसावे असा होऊ शकते.
कारण शेवटी मुद्दा हा सुद्धा असतो की फुकटात बातम्या छापल्या तर त्यांची दुकानं कशी चालायची आणि त्यांच्या पत्रकारांचे पोट कशे भरायचे त्यांचा पगार कसा करायचा हा सुद्धा त्यामागचा उद्देश असू शकतो.
आता हे आपल्याला केव्हा कळत जेव्हा आपण एखाद्या वृत्तपत्रात सुंदर मुलींचे एखाद्या कार जवळ उभे असलेले चित्र बघतो.
आणि त्यासाठी बर्यापैकी जागा ही वापरल्या गेलेली असते. तर कधी आपल्याला चूर्णाचा डब्बा घेऊन उभा असलेला एखादा नट किंवा कलाकार दिसतो.
तर कधी एखादी साडीची किंवा सोन्याच्या बांगड्यांची जाहिरात करणारी स्त्री दिसते तर ह्या जाहिरातींसाठी बर्यापैकी जागा त्यांच्या वर्तमानपत्रात मिळालेली दिसते.
कारण ह्यातून त्यांना बर्यापैकी कमाई ही होत असते आणि तिकडे इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर सुद्धा आपल्याला बर्यापैकी जाहिराती या सातत्याने प्रदर्शित होताना दिसतात.
तर ह्यातून त्यांची कमाई ही होत असते. त्यामुळे मग कित्येकदा फक्त आपल्याला त्याच बातम्या दिसतात ज्या बातम्यांची किम्मत दिली गेली असते
आणि अनेक अशे चांगले मुद्दे जरी अनेक पुढारी किंवा अनेक लोकांसाठी काम करणारे लोकं मांडत असतील
तर त्या बातम्या किंवा त्या गोष्टी ह्या कधी वृत्तपत्रांमध्ये ह्या दिवसांत येतांना दिसत नाही. त्यामुळे कित्येकदा आपल्याला फक्त वृत्तपत्रांमध्ये पांचट गोष्टी आणि विषय वाचायला मिळतात आणि त्याच गोष्टी लोकांच्या माथी मारल्या जाते.
नाहीतर मग जिथे जिथे ज्या ज्या राज्यात ज्यांची ज्यांची सत्ता आहे त्या सत्तेत असलेल्या पुढाऱ्यांच्या बातम्या किंवा त्यांचे लेख आणि पक्षाच्या बातम्या नकळतपणे लोकांच्या गळी उतरवलेले दिसतात.
आणि सगळी कडे तेच चित्र आपल्याला बघायला मिळते . तर अश्या प्रकाराची परिस्थिती आज प्रसारमाध्यमांची झालेली दिसते.
पत्रकार सुद्धा या दिवसांत देण्यासाठी आणि त्याच बातम्या छापण्यासाठी धडपड करतांना दिसतात ज्या बातम्यांची किम्मत त्यांना दिल्या गेलेली असेल.
त्यामुळे ह्या दिवसांत वृत्तपत्रांचा दर्जा हा खालावल्या सारखा वाटतो. मात्र ही परिस्थिती सुधारणे आवश्यक आहे अस वाटत जर आपला समाज अधिक प्रगत, सुरक्षित आणि समृद्ध व्हावा जर का आपल्याला वाटत असेल तर ह्या साठी नक्कीच प्रसारमाध्यमांची आणि पत्रकारांची आणि वृत्तपत्रांची भूमिका सुद्धा अतिशय महत्वपूर्ण असेल अस वाटत.
कारण तळागाळातील आणि जमिनीवरील अनेक अशे मुद्दे लोकांचे असतात की त्या मुद्द्यांच लोकांसमोर येणे सरकार समोर येणे हे आवश्यक असते तेव्हा कुठे तिथे शासनाकडून काही लक्ष घातल्या जाऊ शकते आणि काम केल्या जाऊ शकते.







