काँग्रेसची दिल्ली येथील रॅली हि वोट बचाव देश बचाव रॅली नसून ती घुसखोर वाचवा रॅली होती . इंडिया आघाडी आणि विरोधकांनी रविवारी दिल्ली येथे व्होट बचाव देश बचाव हा महामोर्चा काढला होता .
या दरम्यान , भाजपचे नेते आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर तिखट शब्दात ताशेरे ओढले.
या दरम्यान ते म्हणाले कि जर राहुल गांधी यांना पंतप्रधान बनायचे असेल , तर त्यांनी त्यांच्या त्या ‘बनावट संसदेतच जीवनभर पंतप्रधान बनून राहावे .कारण देशाच्या मुख्य संसदेत आणि जनतेच्या दरबारात त्यांना पंतप्रधान बनून येण्याची संधी मिळणार नाही .
सतत खोटे बोलणे, नकारात्मकता पसरवणे आणि संसदेचे कामकाज रोखणे हीच काँग्रेसची प्रवृत्ती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा त्यांना विरोधी बाकावर बसावं लागू शकते अशा प्रकारची भावना सुद्धा त्यांनी या दरम्यान व्यक्त केली .
सणासुदीच्या काळात दिल्लीत हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. दिल्लीतील व्यापाऱ्यांनी दिवाळीनंतर रॅली घेण्याची विनंती त्यांनी वारंवार केली होती.
परंतु काँग्रेसने व्यपाऱ्यांची विनंती झिटकारून त्याच काळात मुद्दाम रॅली काढली. असं सुद्धा ते यावेळी म्हणाले .






