नवी दिल्ली येथील रामलीला मैदानावर काल रविवारी इंडिया आघाडीचा आणि विरोधकांचा मोठा मोर्चा पार पडला . या मोर्चाद्वारे इंडिया आघाडी आणि विरोधकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली .
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असं ते यावेळी म्हणाले .
या दरम्यान, विरोधकांकडून एसआयआर प्रक्रिया रद्द करण्याची त्याच बरोबर कथित अनियमतांवविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. या दरम्यान इंडिया आघाडी कडून ईव्हीएमचा ऐवजी बॅलेट पेपरवर येणाऱ्या काळात निवडणुका घेण्यात याव्यात अश्या प्रकारची मागणी सुद्धा करण्यात आली .
इंडिया आघाडीचा कालचा दिल्ली येथील मोर्चा मध्ये , विरोधी पक्ष नेते राहुल गांधी , समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव , राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सुप्रिया सुळे, प्रियांका गांधी ,ममता बॅनर्जी;
त्याचबरोबर बाकीचा एकोणवीस पक्षाचे प्रमुख नेते आणि प्रतिनिधींनी या मोर्चा मध्ये सहभाग घेतला







