गाव खेड्यांमध्ये अश्या प्रकारचे टाके काही ठिकाणी ग्रामपंचायतींकडून किंवा गावकऱ्यांकडून बनवल्या गेले तर त्यामुळे, ज्यांच्याकडे गायी, म्हशी किंवा शेळ्या आहेत, त्यांना अश्या प्रकारचा टाक्या असण्याचा चांगला फायदा हा होऊ शकतो;
त्यामुळे गावातील शेतकरी आणि बाकीचे लोकं ज्यांचा कडॆ गायी बकऱ्या आहेत त्यांना आव्हानात्मक आणि कठीण दिवसांत अधिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही .
ज्या ज्या क्षेत्रात पाण्याचा प्रश्न हा मोठा असतो तिथे , अश्या प्रकारचे टाके वगैरे बांधण्यात आले तर त्यामुळे अनेक जनावरांना वणवण भटकंती उन्हाळ्यात अधिक करावी लागणार नाही.
त्याचबरोबर , गावखेड्यांत आणि शहरांमध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये पाण्याच्या पाईपलाईन फुटलेल्या दिसतात आणि त्यातून सतत पाणी वाहत असते, अश्या प्रकारचं चित्र हे बघायला मिळत .
आणि ते पाणी सातत्याने वाया जात असतं व ते कुणाचाच उपयोगात येताना दिसत नाही; आणि कित्येकदा कुणाचं त्याकडे लक्ष सुद्धा नाही आहे असं सुद्धा चित्र बघायला मिळत . त्याचबरोबर तिथे कोणी अनेक दिवसांपासून दुरुस्ती करण्यासाठी आलेलं नाही असं सुद्धा चित्र बघायला मिळत . त्यामुळे तिथलं पाणी असच वाहत आहे असं चित्र बघायला मिळत .
तर ज्या काही पाईपलाईन गावात फुटलेल्या आहेत त्या जर दुरुस्त केल्या गेल्या तर त्या मुळे मोठ्या प्रमाणात वाया जाणार पाणी हे अनेकांचा उपयोगात येऊ शकेल आणि त्याचसोबत प्रत्येक गावात जर का जनावरांसाठी अश्या प्रकारचे काही टाके बांधले गेले , आणि तिथे एक साधासा नळ जोडला गेला , तर अनेक जनावरांना त्याचा बराच फायदा हा होऊ शकतो .
त्याचबरोबर , ज्या क्षेत्रांमध्ये जिथे दरवर्षी पाऊस कमी पडतो , तिथे पावसाळा संपताच तिथल्या लोकांना , शेतकऱ्यांना आणि त्यांचा जनावरांना सुद्धा अनेक समस्यांना सामोरे जावं लागत .
त्यामुळे, ज्या भागांमध्ये पाऊस कमी पडतो , तिथे पावसाळा संपताच पाण्याची बचत कश्या प्रकारे करता येईल आणि नियोजन करून पाणी कश्या प्रकारे उपयोगात आणता येईल याचे प्रयत्न सूर होणे आवयशक असते .
त्याचसोबत पाण्याचा वापर व नियोजन कसे करावे हे प्रत्येकाने समजून घेणे हे सुद्धा आवश्यक असते . जेणेकरून गावातील आणि शहरातील लोकांना कडक उन्हाळ्यात अधिक समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.
तर दिलेल्या चित्रातील टाक्यांसारखे , लहान पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या, तर त्यामुळे शेतकऱ्यांचा जनावरांना आणि गावातील जनावरांना सुद्धा त्याचा मोठा लाभ हा मिळू शकतो .
त्याचबरोबर , नद्या आणि तलावांमधील पाणी स्वच्छ असणे हे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्या भागातील लोकं वर्षभर त्याचा वापर करू शकतील. मात्र आपलं, याकडे मोठं दुर्लक्ष हे होत आहे असं चित्र बघायला मिळत हे तेवढच खरं आहे.







