अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आपल्या सध्याचा भारत भेटीत गुजरात येथील जामनगर येथे सुद्धा भेट दिली या दरम्यान त्यांनी येथील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जगातील सर्वात मोठ्या सिंगल साईट तेल शुद्धीकरण कारखान्याला या वेळी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर देखील उपस्थित होते.
या दरम्यान अंबानी कुटुंबाकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं . जामनगरमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी मार्को रुबियो यांचे स्वागत केले.
या बैठकीत जागतिक ऊर्जेची स्थिती तसेच प्रगत तंत्रज्ञान, आणि व्हेनेझुएलाच्या क्रूड ऑईलवर प्रक्रिया करण्याच्या रिलायन्सच्या क्षमतेवर सकारात्मक चर्चा हि या वेळी पार पडली .
जामनगरला भेट देण्यापूर्वी मार्को रुबियो यांनी मुंबईत भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची सुद्धा भेट घेतली होती .






