केरळ मध्ये नुकताच विधानसभेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये युडीफ ला तिथल्या लोकांनी यंदा त्यांच्यावर विश्वास दाखवून निवडून दिल .
काल काँग्रेसच्या नेत्यांसमक्ष आणि बाकीच्या पाहुण्यांचा आणि नेत्यांचा उपस्थितीत आणि केरळचा जनतेचा उपस्थितीत व्ही. डी. सतीशन यांनी केरळचा मुख्यमंत्री पदाची शफत घेतली
यादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेस चे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे , काँग्रेसच्या नेत्या आणि सरचिटणीस प्रियंका गांधी ह्या सुद्धा ह्या शफतविधी दरम्यान उपस्थित होत्या .
या दरम्यान त्यांनी व्ही. डी. सतीशन आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा सुद्धा अभिनंदन केलं .
त्या पुढे म्हणाल्या कि त्यांना आशा आहे कि व्ही. डी. सतीशन यांचा कार्यकाळात केरळचा विकास होईल आणि जनतेमध्ये बंधुभाव आणि एकात्मतेची भावना तिथे नांदेल .
त्याच बरोबर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुद्धा यादरम्यान व्ही डी सतीशन यांना मुख्यंमत्रीपदाची शफत घेतल्याबद्दल त्यांचं अभिनंद केलं आणि ते पुढे म्हणाले कि केरळचा जनतेने या सरकारसाठी लढा दिला आहे तेव्हा त्यांचाच आवाज या सरकारला पुढे दिशा देईल.
पुढे व्ही डी सतीशन यांनी मुख्यंमत्रीपदाची शफत घेतल्यानंतर म्हंटल कि युडीफ टीम लोकांच्या आकांक्षांना सत्यात उतरवेल आणि निवडणुकीदरम्यान लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करू







