भारताचे पंतप्रधान ह्या दिवसांत विदेश दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी संयुक्त अरब अमिरात इथे भेट दिली. तिथे त्यांचे अबू धाबी येथील विमानतळावर स्वागत झाले .त्यानंतर त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांचा सोबत भेट घेतली .
या भेटीमध्ये त्यांचा मध्ये ऊर्जा , गुंतवणूक, पुरवठा साखळी आणि इतर अनेक प्रमुख क्षेत्रांमध्ये भारतआणि संयुक्त अरब अमिराती संबंध अधिक दृढ करण्याच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांकडून भर देण्यात आला .
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँड्स मधील अॅमस्टरडॅम मध्ये आगमन झाले या दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले कि नेदरलँडचा दौरा हा आमचा करीता विशेष आहे . नेदरलँड्स चा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा भारत आणि युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे व्यापार आणि गुंतवणुकीच्या संबंधांना मोठी चालना मिळाली आहे.
यामुळे आम्हाला तंत्रज्ञान, संरक्षण , पाणी, स्वच्छ ऊर्जा आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये संबंध अधिक दृढ करण्याची संधी या द्वारे मिळणार आहे असं ते पुढे म्हणाले .त्यांनतर पंतप्रधान मोदी यांनी
रॉयल पॅलेसमध्ये राजे विलियम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. त्यावेळी तंत्रज्ञान, संशोधन, शाश्वत विकास, वाणिज्य आणि जलस्रोत यांसारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये भारत आणि नेदरलँड्स मैत्रीला चालना देण्याचा दोन्ही देश येणाऱ्या भविष्यात प्रयत्न करतील ह्यावर भर देण्यात आला .
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्स चे पंतप्रधान रॉब जेटेन आर्थिक संबंधांवरील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज परिषदेत सहभागी झाले . या परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतातील विविध क्षेत्रांमधील त्यांच्या गुंतवणुकीविषयी चर्चा केली.







