दलित , शोषित पीडित आणि वंचितांसाठी आणि स्त्रियांचा शिक्षणासाठी आयुष्यभर कार्य करणारे थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले
यांना आज देशाचे पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली आणि त्यांचा कार्यामुळे समाजाला कशा प्रकारे फायदा झाला
यावर त्यांनी आपले विचार थोडक्यात मांडले . ते या दरम्यान म्हणाले कि त्यांचा कार्याने भारतासारख्या देशात स्त्रियांच्या शिक्षणासाठी मार्ग अधिक सुकर होण्यास मदत झाली आणि पुढे समाजात बरेच चांगले बदल घडून येण्यास प्रेरणा मिळाली .







