नुकताच हिंदी चित्रपट अभिनेत्री मृणाल ठाकूर हिने पुण्याला भेट दिली आणि तिथे तिने पुण्यातील प्रसिद्ध दगडू शेठ हलवाई गणेश मंदिराला भेट दिली .
तिथे येऊन तिने बाप्पांचे आशीर्वाद घेतले आणि तिथले काही छायाचित्र तिने आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम या हँडलवर सुद्धा टाकले .
तिने या दरम्यान आपल्या भावना व्यक्त केल्या आणि म्हंटल कि जर का तुम्ही पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ ?.
तर ह्या प्रकारच्या भावना तिने पुण्यामध्ये आल्यावर मांडल्या .व आपल्या सहकाऱ्यांसोबत चे फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केलेत .
मृणाल ठाकूरचा काहीच दिवसांपूर्वी “दो दिवाने शहर मे” हा चित्रपट येऊन गेला . त्या चित्रपटाला चित्रपट चाहत्यांकडून बराच सुंदर प्रतिसाद मिळाला .
त्याचबरोबर तिचा येत्या महिन्यात डकैत हा चित्रपट येऊ घातला आहे . मृणाल ठाकूरने या पूर्वी सीता रामम , सनऑफ सरदार २, हाय नाना , द फॅमिली स्टार या प्रकारच्या चित्रपटांत सुद्धा काम केलं आहे.
आणि आणखी बऱ्याचशा चित्रपटात सुद्धा तिने या पूर्वी काम केलं आहे आणि तिला प्रेक्षकांचा आणि चाहत्यांकडून प्रेम हे मिळत असतं
तिचे सोशल मीडियावर सुद्धा बरेच फॅन्स आहेत ज्यांना तिला फालो करायला आवडतं .







